…म्हणून CM देवेंद्र फडणवीसांची सर्वात ‘मोठी’ फॅन झाली ‘ही’ अभिनेत्री ; म्हणाली, फिल्मी स्टाईलने…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माही गिल सध्या फॅमिली ऑफ ठाकुरगंज या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमातील बोल्ड लुकसोबतच सध्या फिक्सर या शोच्या सेटवर झालेल्या मारहाण प्रकरणामुळे माही गिल चर्चेत आली आहे. फिक्सर शो साठी माही गिल मीरा रोडवर शुट करत होती. यावेळी काही गुंडांनी माहीसोबतच पूर्ण टीमवर हल्ला करत मारहण केली होती.

यानंतर मीरा रोड पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली परंतु पोलिसांनी मदत करण्याऐवजी उलट माही गिल आणि टीमवर परमिशन नसल्याचा आरोप लावला. या प्रकरणी फिक्सरच्या टीमसोबत माहीने महाराष्ट्राचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यानंतर आनन फानन मध्ये मीरा रोड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना माही गिल म्हणते की, “ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईलने गुंडांना अटक केली यानंतर मी त्यांची सर्वात मोठी फॅन झाले. त्यांनी जे काही केलं ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे.” पुढे बोलताना माही असेही म्हणाली की, “यावेळीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनावेत.”

तेव्हाच मी खऱ्या आयुष्यात दबंगगिरी करते

माही गिल म्हणते की, “मी सिनेमात दबंग रोल करते परंतु खऱ्या आयुष्यात तोपर्यंत दबंगगिरी करत नाही जोपर्यंत मला कोणी त्रास देत नाही. एकदा कॉलेजमध्ये एका मुलाने माझी छेड काढली होती तेव्हा मी दबंगगिरी दाखवत त्या मुलाच्या कानशिलात लगावली होती. तेही अशा काळात जेव्हा अशा प्रकरणावर एखाद्या मुलीने बोलणेही खूप मोठी गोष्ट होती.

लग्नाच्या प्रश्नावर माही म्हणते…

फॅमिली ऑफ ठाकुरगंज या सिनेमात माही गिल जिमी शेरगिल सोबत रोमँस करताना दिसणार आहे. ऑनस्क्रीन बोल्ड अंदाजात रोमँस करणाऱ्या माहीला जेव्हा लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा माही हसत हसत सवाल उपस्थित करत म्हणाली की, “लग्न करण्याची गरजच काय आहे ? मला नाही करायचं लग्न.”

 

अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीचे ‘हॉट’ फोटो व्हायरल

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

अल्पसंख्याकावर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला – हाफिज अ.गफार

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

पाच सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे वजन होईल कमी

व्यायाम केल्यास मधुमेहात होऊ शकते सुधारणा