Mere Angne Mein : होळीच्याआधीच रिलीज झालं आसिम आणि जॅकलीनचं ‘धमाकेदार’ गाणं (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 13 चा रनरअप आसिम रियाज आणि बॉलिवूड स्टार जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून आपल्या साँगमुळं चर्चेत आहेत. बिग बॉस 13 संपल्यानंतर लगेचच या दोघांचे एकत्र फोटो समोर येताना दिसले होते. यानंतर चाहते आसिम आणि जॅकलीनला एकत्र पाहण्यासाठी आतुर झाले होते. आता मात्र चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण जॅकलीन आणि आसिमचं हे हां रिलीज झालं आहे. मेरे अंगने में असं या गाण्याचं नाव आहे.

टी सीरिजच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या गाण्यात आसिम एक साधा सुधा मुलगा बनला आहे. जॅकलीन 1435 च्या दशकातील राजकुमारी आहे. हे गाणं होळी थीमवर तयार करण्यात आलं आहे. 1981 साली रिलीज झालेल्या बिग बी अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांच्या लावारीस सिनेमातील मेरे अंगने में या गाण्याचं हे रिमिक्स व्हर्जन आहे. गाण्याच्या लिरीक्समध्येही बराच बदल करण्यात आला आहे. फेमस सिंगर नेहा कक्करनं आणि तनिष्कनं हे गाणं गायलं आहे.

काय आहे गाण्यात ?
गाण्याची सुरुवात 1435 च्या दशकापासून होते. यात जॅकलीन फर्नांडिस दाखवण्यात आली आहे. यानंतर दिसतो 2020 चा जमाना. यात एक मुलगा आणि एक मुलगी होळी पार्टी एन्जॉय करत आहेत. यात मुलगी आपल्या प्रियकरावर नाराज होते आणि त्याला 1435 च्या दशकात पाठवते. यात मुलालं रंग रूप बदलून जातं. इथे त्याची भेट जॅकलीनशी होते जी एक राजकुमारी आहे. यानंतर तो मुलगा म्हणजे आसिम जॅकला इम्प्रेस करतो आणि तिलाच 2020 मध्ये घेऊन येतो. एकूण सांगायचं झालं तर हे गाणं एंटरटेनिंग आहे. यातील आसिमचे डान्स मुव्स तुम्ही मिस कराल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like