Bollywood Movie | सनी देओल व अक्षय कुमारची होणार बॉक्सऑफिसवर टक्कर; दोन्ही सिक्विल होणार एकाच दिवशी प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडकडून अनेक दिवसांपासून प्रेक्षक जबरदस्त कहानी ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या (Bollywood Movie) प्रतीक्षेत आहेत. बॉलीवुडचे चित्रपट भरघोस कमाई करण्यात मागे पडत आहे. मात्र येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये प्रेक्षकांना अनेक जबरदस्त चित्रपटांची मेजवानी मिळणार असून प्रेक्षकांसाठी सुपरहिट चित्रपट येत्या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. (Bollywood Movie) त्यापैकी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असे अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ (Gadar 2) तर अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) असे दोन सिक्विल चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून सनी व अक्षयच्या चित्रपटांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे.

अभिनेता सनी देओल (Actor Sunny Deol) व अभिनेत्री अमिषा पटेल (Actress Ameesha Patel) यांची हिट जोडी असलेला गदर चित्रपटाचा सिक्विल ‘गदर 2’ येत्या 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Gadar 2 Movie Release Date) 2001 साली प्रेक्षकांचे मनभरुन मनोरंजन करणारी तारा सिंग व सकिनाची जोडी तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘गदर 2’ चित्रपटातील ‘उड जा काले कावां’ (Udja kale kawa Reprise) हे गाणे व चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याला व टीझरला (Gadar 2 Teaser) प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळत आहे. या प्रेमकहानीमध्ये 21 वर्षांनंतर काय घडते याबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत.

तर 11 ऑगस्ट याच दिवशी बॉलीवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) याचा बहुचर्चित OMG 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (OMG 2 Movie Release Date) 2012 साली प्रदर्शित झालेल्या ओह माय गॉड चित्रपटाचा हा सिक्विल आहे. अभिनेता अक्षय कुमारने यामध्ये कृष्णाची भूमिका साकारली होती. तर यावेळेस तो भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. (Akshay Kumar In OMG 2) अक्षय कुमारच्या या OMG 2 चित्रपटाच्या कहानी काय असणार आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून त्याचे पोस्टर (Oh My God 2) पोस्ट करण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये अक्षय कुमारचा लूक प्रेक्षकांना आवडला असून त्यांच्या लूकने चित्रपटामध्ये काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक बिग बजेट व सुपरस्टारचे चित्रपट येणार आहेत. (Bollywood Movie) यामध्ये गदर 2 व OMG 2 दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून त्याच्यामध्ये चूरस लागली आहे. अभिनेता सनी व अभिनेता अक्षय कुमार यांच्या मध्ये बॉक्सऑफिसवर टक्कर होणार आहे. या दोन्ही सिक्विलमध्ये कोणता चित्रपट भाव खाऊन जाईल व सर्वाधिक कमाई करेल याकडे चित्रपट समिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title :  Bollywood Movie | gadar 2 vs omg 2 sunny deol akshay kumar clash on box office Entertainment News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय