निधनाची खोटी बातमी समोर आल्यानंतर प्रचंड संतापली ‘ही’ ज्येष्ठ अभिनेत्री ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन  – गेल्या वर्षी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मुमताज यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आली होती. पुन्हा एकदा असंच काहीस झालं आहे. विशेष बाब अशी की, एका मंत्र्यांननं त्यांना श्रद्धांजलीही वाहिली. यानंतर अभिनेत्रीनं जिवंत असल्याचं सांगितलं आहे.

अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पंजाबचे क्रिडा मंत्री राणा गुरमीत एस सोढी यांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली दिली. यानंतर ही खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर मुमताज खूप परेशान झाल्या आणि त्यांनी स्टेटमेंट जारी करत संताप व्यक्त केला आहे.

एका इंग्रजी वृत्तासोबत बोलताना मुमताज म्हणाल्या, “मी जिवंत आहे. एकदम ठणठणीत आहे. मला आनंद आहे की, ही बातमी खरी आहे का हे पाहण्यासाठी काहींनी मला कॉल केला. मला नाही माहिती कोण का जाणून बुजून अशा बातम्या पसरवत आहे. मागच्या वर्षीही असंच झालं होतं. माझं कुटुंब किती पेरशान झालं होतं. मी लॉकडाऊनमध्ये माझी मुलगी, जावई, पती आणि नातवांसोबत लंडनमध्ये आहे. मी एकदम निरोगी आहे.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्या नातेवाईंकांना देखील ही खोटी बातमी समजली आणि तेही खूप चिंतीत झाले होते. लोक मला का मारू इच्छित आहेत. वेळ येईल तेव्हा मी स्वत:च जाईन. जेव्हा मी मरेन तेव्हा हे सिक्रेट नाही राहणार. माझं कुटुंब सर्वांना ऑफिशियली सांगेल सर्व काही.”