‘पहिलं काम मी मासे विकण्याचं केलं’ : ट्विंकल खन्नाचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ट्विंकल खन्ना आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. यामुळे अनेकदा ती ट्रोलही होत असते. परंतु यामुळे तिला काहीच फरक पडत नाही. आपल्या अ‍ॅटीट्युडबाबत तिने एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. कोणाला काय वाटेल याचा विचार न करता ती कशी बिंधास्तपणे आपलं मत मांडते हे तिने सांगितले आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, आपल्या करिअरबाबत एका मुलाखतीत बोलताना ट्विंकल खन्ना म्हणाली, “मी पहिलं काम माझ्या आजीसोबत मासे विकण्याचं केलं आहे. मी माझ्या लाईफमध्ये अनेक नोकऱ्या केल्या आहेत. मला एका ठिकाणी नाही राहायचं.” ट्विंकलने इंटेरियर डेकोरेटरचंही काम केलं आहे. ती सांगते, “एकेकाळी तर मी इंटेरियरच्या 11 प्रोजक्ट्सवर काम केलं आहे.”

ट्विंकल म्हणाली, “जीवनात काहीच इतकं असं गंभीर नसतं ज्याला घेऊन चेष्टा केली जात नाही. अगदी मृत्यू सुद्धा. मी माझ्या विचारांमुळे अनेकदा अडचणीतही आले आहे. मला प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने करायला आवडते.”

 

Visit : Policenama.com

 

You might also like