अभिनेत्री आणि खा. नुसरत जहाँनं साडी नेसुन शेअर केला फोटो, लोक म्हणाले – ‘ही काय फॅशन आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बांग्लादेशाची अभिनेत्री नुरसत जहॉं टीएमसी खासदार बनल्यानंतर त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. नुसरत जहॉं सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतात. फोटोमुळे कधीकधी त्या ट्रोल होतात. नुकतेच करवाचौथसोबतचे त्यांचे काही फोटो व्हायरल झाले. त्यांच्या फोटोंना अनेकांची पसंती मिळाली. आता त्यांचे काही नवीन फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंचे काहीजण कौतुक करत आहे तर काहीजण ट्रोलही करत आहे. नुसरत यांची साडी नेसण्याची स्टाईल लोकांना आवडली नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नुसरत यांनी साडीवर फ्रंट ओपन डेनिम जॅकेट परिधान केले आहे. फोटोत नुसरत यांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे, त्यांनी गळ्यात दागिने आणि डोळ्यावर सनग्लासेस घातले आहेत. या फोटोला कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे- ‘थकी हूं फिर भी पोज दे रही हू’. नुसरत यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये नुसरत या एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. अनेकांना त्यांचा हा अंदाज आणि त्यांची फॅशन खूप आवडली पण अनेकांनी त्याची खिल्लीही उडवली. एका युजने टिप्पणी देऊन नुसरत यांना विचारले की ‘ही कोणती फॅशन आहे’ ?

याआधी देखील नुसरत करवाचौथ आणि दिवाळीच्या फोटोंमुळे खूपच चर्चेत होत्या. त्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी पती निखिल जैन यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. नुसरत जहॉं यांची ही पहिली दिवाळी आणि करवाचौथही होती.

https://www.instagram.com/p/B3UyWQsH_PE/

https://www.instagram.com/p/B4IN7P_nPLd/

https://www.instagram.com/p/Bzg9RV8nJQH/

Visit : policenama.com