पतीच्या कडेवरच बसली अभिनेत्री प्रीती झिंटा ! शेअर केला ‘असा’ रोमँटीक फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रीती झिंटा (Preity Zinta) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टीव असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळं ती कायमच अटेंशन घेत असते. अनेकदा तिनं पती जीन गुडइनफ सोबतचे फोटो शेअर केले आहेत. पुन्हा आपल्या एका अशाच फोटोमुळं ती चर्चेत आली आहे.

प्रीतीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोची खास बात अशीय की, प्रीती तिच्या पतीच्या कडेवर बसली आहे. स्माईल करत दोघंही पोज देताना दिसत आहेत.

फोटोवरून लक्षात येत आहे की, ती एका व्हॅकेशनवर आहे. बर्फाळ ठिकाणी दोघं फिरण्याचा आनंद घेत आहेत. दोघंही खूप खुश आणि एन्जॉय करताना दिसत आहेत.

फोटो शेअर तिनं खास आणि मजेदार असं कॅप्शनही दिलं आहे. यात ती सांगत आहे की, तुझ्यामुळं ही स्माईल करत असते.

प्रीतीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रीतीचे अनेक चाहतेही या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत तिच्या लुकचं आणि या जोडीचं कौतुक केलं आहे.

प्रीतीच्या आणि जीनच्या लग्नाबद्दल बोालयचं झालं तर लग्नाबद्दल बोलायचं झालं तर झिंटानं जीन गुडइनफ सोबत 2016 साली लग्न केलं होतं. दोघंही आता लॉस एंजेलिसमध्ये राहतात.