रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘लग्नपत्रिका’ व्हायरल, जाणून घ्या वास्तव…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत अशा चर्चा आहेत. असे असतानाच आता दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आली असून व्हायरल होताना दिसत आहे. या मॅरेज कार्डवर लग्नाच्या वेळेसह जागेचाही उल्लेख आहे.

या कार्डनुसार रणबीर आणि आलियाचं लग्न 22 जानेवारी 2020 रोजी जोधपूरमधील उमेदभवनमध्ये होणार आहे. ही लग्नपत्रिका पूर्णपणे फेक आहे हे लगेचच लक्षात येतं. कार्डचं डिझाईनही खूप खराब आहे. कार्डवर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचीही नावे लिहिलेली आहेत.

आणखी एक गोष्ट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे कार्ड फेक आहे. कारण या कार्डवर महेश भट्ट ऐवजी मुकेश भट्ट लिहिलं आहे. आलिया भट्ट, मुकेश भट्ट यांची मुलगी असल्याचं म्हटलं आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे यावर आलियाच्या नावाचं स्पेलिंगही चुकीचं दाखवण्यात आलं आहे. 22nd जानेवारीलाही
22th जानेवारी लिहिलं आहे.

View this post on Instagram

Shaadi ho gayi types 😭 Now go sleep kid 😴😂 Me – Lemme first aesthetically edit this and present as a post Also me – Stares toooooooo long at their smiles and affection and touching 😍😍😍😍 Also me – Bhaaad mein jaaye aesthetics! I'm gonna do that later but for now I have TO CELEBRATE THE MOMENT WITH MY RANLIA BACCHAS !!! 💃🎊🍾 Also me – Pehle Twitter pe roun (cry) ya Instagram pe 🤦😭😭😭 Also me – Breathe hard Jem, you've got this! Bolo #JAIRANLIA 💚💙♥️👏💥 ________________________ #ambani #ganeshchaturthi #mumbai #ranbirkapoor #ranbiralia #aliaranbir #jairanlia #ranbiraliafc #shipper #legends #bollywood #cinema #heart #couplegoals #love #mine #babies #icons #followforfollowback #instagood

A post shared by aloobir, ugh✨♥️ (@ranbiraliafc) on

रणबीर आणि आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात दोघे दिसणार आहेत. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. याशिवाय आलियाकडे RRR आणि सडक हे सिनेमेदेखील आहेत.

Visit : policenama.com

 

You might also like