‘या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये ‘एन्ट्री’ करणार ‘चिक्कू’ ऋषी कपूर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता ऋषी कपूर या दिवसांमध्ये अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करत आहेत. असे सांगितले जात आहे की, ऋषी उपचारानंतर पुन्हा एकदा चित्रपटामध्ये येणार आहे. गुरुवारी ऋषीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले गेले. त्यानंतर ऋषीच्या चाहत्यांमध्ये खुशीचे आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापार विश्लेषक तरन आदर्शने आपल्या ट्विटर अकाउंटवर ऋषीचा आगामी चित्रपट ‘झूठा कहीं का’ चे पोस्टर शेयर केले. चित्रपटात ऋषी कपूरसोबत जिमी शेरगिल, सनी सिंह आणि ओमकार सिंह सारखे कलाकार दिसणार आहेत.

ऋषी कपूरने कॅन्सरच्या ट्रीटमेंट बद्दल एका मुलाखती वेळी सांगितले. ऋषीने सांगितले की, १ मे ला यूएस मध्ये माझी ८ महिन्याची लंबी ट्रीटमेंट चालू होती. मला देवाकडून आशीर्वाद मिळाला आणि आता मी कॅन्सर पासून मुक्त झालो आहे. त्याने सांगितले की, ‘मला बोन मैरो ट्रांसप्लांट करायचे आहे त्यासाठी कमीत कमी २ महिने लागतील. आजारातून बाहेर पडणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं माझ्या परिवारामुळे आणि माझ्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे झाले आहे. मी त्यांचे आभार मानतो. आता अशी बातमी समोर आली आहे की, ऋषी कपूर या वर्षी ऑगस्ट मध्ये भारतात परत येणार आहे.

Video : ‘या’ अभिनेत्रीने तोडली परिवाराची ‘परंपरा’, सगळ्यांच्या विरोधात घेतला ‘हा’ निर्णय !

रायगडमध्ये हायप्रोफाईल ‘रेव्ह पार्टी’चा पर्दाफाश, ‘नको त्या अवस्थेत’ बॉलिवूड अभिनेत्री, TV कलाकार

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा

भारतीय नौदलात १२ वी पास उमेदवारांना मोठी संधी, या पदांसाठी २७०० जागांची भरती

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें