सायरा बानोनं दिलं दिलीप कुमार यांचं हेल्थ अपडेट ! म्हणाल्या- ‘त्यांची तब्येत ठिक नाहीये, त्यांच्यासाठी प्रार्थना करा’

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील दिग्गज अदाकारा सायरा बानो (Saira Banu) आणि दिलीप कुमार (Dilip Kumar) बॉलिवूडमधील त्या कपलपैकी एक आहेत जे प्रेमाची मिसाल आहेत. दोघांच्या लग्नाला 54 वर्षे पूर्ण झाली आहे. आजही दोघं एकमेकांच्या सोबत आहेत. दिलीप कुमार यांची तब्येत गेल्या अनेक वर्षांपासून ठिक नाहीये. अशात सायरा बानो गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची देखभाल करत आहे. अलीकडेच त्यांनी दिलीप कुमार यांच्या तब्येतीचे अपडेट दिले आहेत.

सायरा बानो यांनी सांगितलं आहे की, दिलीप कुमार काही दिवसांपासून खूप अशक्त झाले आहेत. त्यांची इम्युनिटीही कमी झाली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ते दिलीप कुमार यांची देखभाल कोणत्या दबावालाखाली नाही तर त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून करते. त्यांनी त्यांची देखभाल करायला आवडतं.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, माझा हा हेतू अजिबात नाही की, कोणी माझं कौतुक करावं आणि म्हणावं की, मी किती डेडीकेटेड वाईफ आहे. सध्या ते खूप अशक्त आहेत. त्यांची इम्युनिटी खूप कमी झाली आहे. अनकेदा ते हॉल पर्यंत येतातही आणि पुन्हा रूममध्ये जातात. त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करा असंही त्यांनी सांगितलं आहे.