‘भाईजान’ सलमानचं आणखी एका टॉपच्या अभिनेत्याशी ‘फाटलं’, पुन्हा कॅटरीनाचं ‘कारण’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सलमान खानच्या 6 फ्रेंड लिस्टमधून एखादा व्यक्ती किंवा एखादा स्टार बाहेर पडला तर तो त्याला कधीच माफ करत नाही. त्याला न आवडणाऱ्या लोकांच्या यादीत आता आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे. हे नाव आहे अभिनेता विकी कौशल. विकीचा कसूर हा आहे की, त्यानं सलमानची खास मैत्रीण कॅटरीना कैफ सोबत मैत्री केली आहे.

https://www.instagram.com/p/B8rjDqpBUOL/

हाच तोच विकी कौशल आहे ज्यानं एकदा गंमती गंमतीत सलमानसमोर कॅटला आपली दिल की बात सांगितली होती. सलमान हे सगळं पाहून स्माईल करत होता. विकी वेगानं उदयास येताना दिसत आहे. येणाऱ्या काळाचा त्याला सुपरस्टार मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून विकीच्या सिनेमांसोबतच त्याच्या आणि कॅटच्या मैत्रीच्या बातम्याही लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B8rjDAJh4rm/

अनेक दिवसांपासून विकी आणि कॅट एकत्र दिसत आहेत. एका मित्राकडेही ते चोरून लपून भेटले आहेत. जी कधी सलमानची मैत्रीण होती ती आता त्याला झटका देत विकीकडे गेली आहे. गेल्या महिन्यांपासून सलमान त्याची जवळची मैत्रीण कॅटला विकी सोबत जवळीकता वाढवताना दिसत आहे. जेव्हा कॅट आणि विकीच्या भेटीच्या बातम्या समोर येतात तेवहा या गोष्टी सलमानच्या मनाल लागतात. असं म्हटलं जात आहे की, मजबूर होत सलमाननं विकीला आपल्या गुड बुकमधून बाहेर केलं आहे.

https://www.instagram.com/p/B8mbM0XBC6W/