OTT नव्हे तर थिएटरमध्येच रिलीज होणार ‘भाईजान’ सलमानचा ‘राधे’ ! 2021 च्या ईदवर साऱ्यांच्या नजरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा सिनेमा राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe : Your Most Wanted Bhai) ची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. सलमानचा हा बहुप्रतीक्षित सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 2021 च्या ईदनिमित्त हा सिनेमा रिलीज करण्यासाठी मेकर्सची प्लॅनिंग सुरू आहे. असाही अंदाज लावला जात होता की, हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. यामुळं चाहते नाराज होते की, त्यांना थिएटरमध्ये धमाल करता येणार नाही. परंतु आत सर्व चर्चांना पूर्ण विराम लागला आहे.

बॉलिवूडमधील ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यानं ट्विट करत सिनेमाच्या रिलीजबद्दल माहिती दिली आहे. राधे ओटीटीवर रिलीज होणार असल्याच्या चर्चा निराधार आहेत. असा अंदाज लावला जात होता की, सलमानचा राधे सिनेमा थिएटरऐवजी ओटीटीवर रिलीज केला जाईल. परंतु हे सत्य नाही. मेकर्सनी स्पष्ट केलं आहे की, हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नजरा आता 2021 मधील ईदवर लागल्या आहेत.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.

You might also like