सपना चौधरीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोवर चाहते फिदा !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हरियाणवी क्वीन सपना चौधरीचा डान्सचे अनेक चाहते आहेत. सपना केवळ तिच्या गाणी आणि नृत्यासाठी प्रसिद्ध नाही तर ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. स्टेज शोद्वारे नृत्य कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या सपनाने सध्या बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. सध्या सपना सोशल नेटवर्क्सवर तिची नवीन छायाचित्रे/ फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. यामुळे तिचे फॅन्स खूप वाढले आहे. तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओला खूप प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सपनाचे फॅन फॉलोव्हिंग मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाहीत. सपनाचा कोणताही व्हिडिओ आणि फोटो दिसताच ते व्हायरल होते. दरम्यान, सपनाचे एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रात तिचे सौंदर्य पाहायला मिळत आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे.

बिग बॉस 11 ’फेम सपना चौधरी हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतः एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिचा देसी स्टाईल लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. सपनाचे हे ब्लॅक अँड व्हाईट चित्र पाहून चाहते वेडावले असल्याचे आढळत आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, ती वधूसारखे दिसत आहे. तिच्या हातात बांगड्या आहेत. तसेच, हार आणि तिने नववधूप्रमाणे भांगेत कुंकू लावल्याचे दिसत आहे. त्याचवेळी, फोटोत तिची पोज देण्याची शैली भिन्न आहे. हा फोटो पोस्ट करत सपनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ’रंग भरो.’ आतापर्यंत हजारो लोकांना हा फोटो आवडला आहे. देशात सपना चौधरीचे चाहते दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर अफलातून कमेंटस् येत आहेत. तसेच सपनाने गाणं गाऊन आणि नृत्य करून अनेकांची मनं जिंकली आहेत. तसेच चाहत्यांमध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी सपना कायम इतर अभिनेत्री प्रमाणे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहत असते.

तसेच, यापूर्वी सपना चौधरीने तिच्या इंस्टाग्रामचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या सुरूवातीस, व्हिंटेज कार दिसली. पार्श्वभूमीवर एक इंग्रजी गाणे वाजले होते. या व्हिडिओत सपना चौधरी छान दिसत होती. यावेळी सपनाने व्हाइट टॉपसह सिल्व्हर कलरचा शिमरी स्कर्ट घातला होता. यासोबत तिने हलका मेकअपही केलाय. हा व्हिडिओ शेअर करताना सपनाने खूप खास कॅप्शन लिहिले. तिने असं लिहिले आहे की, ’दुरी बनाए रखे।’…