आई अमृता सिंहची Xerox Copy आहे सैफ अली खानची लाडकी सारा ! आत्या सबानं शेअर केला खास फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. आता आपल्या एका फोटोमुळं तिनं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. सारा अली खानचा एक फोटो समोर आला आहे जो वेगानं व्हायरल होत आहे. खास बात अशी की, हा फोटो साराची आत्या सबा अली खान (Saba Ali Khan) हिनं शेअर केला आहे.

सबानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात साराची आई अमृता सिंह (Amrita Singh) आणि सारा यांचा फोटो कोलाज केला आहे. यात सारा आणि अमृता एकसारख्याच वाटत आहेत. सारा जणू काही यंग अमृताच वाटत आहे. फोटो शेअर करताना सबानं खास कॅप्शनही दिलं आहे. दोघी शानदार आहेत असं तिनं म्हटलं आहे.

सबानं शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. चाहत्यांचंही म्हणणं आहे की, दोघींमध्ये कमालीचं साम्य आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.