Video : सारा अली खाननं धनुषसोबत जीममध्ये ‘असं’ केलं Workout !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. अलीकडेच ती सुशांतसिंह राजपूत केसमधील (Sushant Singh Rajput) ड्रग्ज कनेक्शनमुळं चर्चेत आली होती. आता आपल्या एका व्हिडिओमुळं तिनं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. सारा अली खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सारा जीममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. खास बात अशी की, तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) देखील वर्कआउट करताना दिसत आहे.

सारानं तिच्या इंस्टावरून एख व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती धनुष सोबत वर्कआऊट करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना सारा म्हणते, ट्रेनिंग विद थलायवा.

साराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

You might also like