‘बैंडिट क्वीन’च्या अभिनेत्रीनं स्वत: सांगितलं ‘गुपित’, एका सीनमुळं रात्र-रात्र रडत होती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट बैंडिट क्वीन’ मध्ये फुलनदेवी ची भूमिका बजावणारी अभिनेत्री सीमा विश्वास यांचा १४ जानेवारी रोजी जन्मदिवस असतो. त्यानिमित्तानेच एका बातचितीमध्ये त्यांनी आपाल्याविषयी अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. आसामच्या नलबारी येथे जन्मलेल्या सीमाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.त्याच्या पालकांनी त्यांना मोठ्या अडचणीत राहून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) येथे त्यांना पाठविले. एक काळ असा होता की जेव्हा सीमाला अभिनेत्री नव्हे तर वकील व्हायचे होते. एनएसडी मध्ये गेल्यानंतर मात्र त्यांचे भाग्य पूर्णपणे बदलले.

कुटुंबाची परिस्थिती पाहून एनएसडीमध्ये गेल्यानंतर सीमाने कधीही घरातून पैसे मागितले नाहीत. एका मुलाखतीत सीमा म्हणाली होती की, जर कुणी तुमच्या क्षमतेवर विसंबून असेल तर त्यांच्याकडून काही मागणे हा गुन्हा आहे. त्यांना ७५० रुपये भत्ता मिळत होता. याच तोकड्या पैशात त्या आपला महिन्याचा खर्च भागवत होत्या. कितीतरी वेळा त्यांनी केवळ एक सफरचंद खाऊन दिवस काढले.

सीमा प्रथम कांजे नोबुमिट्सूच्या ‘रशोमोन’ नाटकातील छोट्या भूमिकेसाठी निवडली गेली. जेव्हा तिने ‘बॅंडिट क्वीन’ केली तेव्हा सीमाचे आयुष्य बदलले.
चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांना सीमाचा अव्यावसायिक पोर्टफोलिओ आवडला आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्यांची निवड झाली.
सीमाने हे पात्र इतक्या प्रभावीपणे बजावले की लोक तिला अजूनही फूलन देवी म्हणून ओळखतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्या वादामुळे रात्रभर रडले …

त्या मूळच्या आसामच्या असल्यामुळे सुरुवातीला त्यांना हिंदी भाषेबाबत समस्या येत होती. त्यांनी या चित्रपटाच्या ओळींचा शेकडो वेळा अभ्यास केला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सीमा यांनी सांगितलं की, चित्रपटात खूप सारे न्यूड सिन होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हे सिन बॉडी डबल वर चित्रित केले गेले होते. तरी देखील त्या वादांमुळे सीमा यांना रात्र – रात्र भर झोप लागत नव्हती. हे सीन शूट करीत असताना दिग्दर्शक आणि कॅमेरामन शिवाय कोणालाच आत येण्याची परवानगी नव्हती अगदी क्रू मेंबरला देखील नाही.

हा वाद इतका टोकाला गेला होता की, सीमा यांनी शेखर कपूर यांना सीन हटवायला सांगितले होते. शेखर कपूरचा असा विश्वास होता की हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटातील लोकांचे क्रौर्य दाखवण्यासाठी हे दृश्य आवश्यक आहे. या दृश्याचे हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कौतुक केले होते, असे सीमा विश्वास सांगतात, पण भारतात ते चुकीच्या पद्धतीने पाहिले जाते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like