जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांची प्रसिद्धी वाढली तेव्हा अमिताभ बच्चन होते चिंतेत, सोबत काम करणेच केले बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत चित्रपटाशिवाय अंतर्गत वादामुळे चर्चेत असतात. त्यामध्ये बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेत्यांमधील वाद समोर आला आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि शुत्रघ्न सिन्हा या दोन अभिनेत्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या वादावर ‘एनिथिंग बट खामोश’ या बायोग्राफीमध्येही लिहिले आहे.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रसिद्धीमुळे अमिताभ बच्चन अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत काम करणेच बंद केले होते. याबाबत त्यांनी त्यांच्या पुस्तकातही लिहिले आहे. त्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले, की लोकं म्हणतात की मी आणि अमिताभ बच्चन यांनी चित्रपट क्षेत्रात एक चांगली जोडी बनवली. मात्र, ते माझ्यासोबत काम करू इच्छित नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांना वाटत होते, की ‘नसीब’, ‘शान’, ‘दोस्ताना’ आणि ‘काला पत्थर’ या चित्रपटात मी आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा प्रभावी भूमिका केली. मात्र, मला यामुळे कोणताही फरक पडला नाही.

अमिताभ बच्चन यांच्यामुळे अनेक चित्रपट सोडले

मी अनेक चित्रपट सोडले आणि सायनिंग अमाउंटही परत केली. ‘पत्थर के लोक’ नावाचा एक चित्रपट होता. प्रकाश मेहरा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटाची स्क्रीप्ट सलीम-जावेद यांनी लिहिली. असे अनेक चित्रपट जे अमिताभ बच्चन यांच्यामुळे सोडले होते. मला माझ्या टॅलेंटसाठी प्रसिद्धी मिळत होती. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांनी मला त्यांच्या काही चित्रपटांत घेतले नाही.