Video : शिल्पा शेट्टी की ‘पॉप सिंगर’ रिहाना ? व्हिडीओ पाहून गोंधळले चाहते

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूडमधील फिट आणि ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या काही दिवसांपासून फोटो आणि व्हिडीओंमुळं चर्चेत येताना दिसत आहे. सोशलवर अ‍ॅक्टीव्ह असणारी शिल्पा आपल्या पोस्टमुळं कायमच लक्ष वेधून घेताना दिसत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो चर्चेत आहे.

शिप्लानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसं पाहिलं तर व्हिडीओत शिल्पा शेट्टीच दिसत आहे. परंतु हा खरा व्हिडीओ हा पॉप सिंगर रिहानाचा आहे. नीट पाहिल्यावर कळतंय की, ही रिहाना नसून शिल्पा शेट्टी आहे. रिहानाच्या दिस इज व्हाट यु केम फॉर या साँगवरील शिल्पाचा हा व्हिडीओ आहे. शिल्पानं फोटोशॉप करत रिहाना ऐवजी तिचा चेहरा लावला आहे. रिहानाचं हे सुपरहिट गाणं 2016 साली रिलीज झालं होतं. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहतेही कंफ्युज झाले आहेत की, ही शिल्पा आहे की, रिहाना.

शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती निकम्मा आणि हंगामा 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमांमधून शिल्पा पुन्हा वापसी करणार आहे. हंगामा 2 मध्ये शिल्पा परेश रावल आणि मीजान जाफरी तर निकम्मामध्ये ती अभिमन्यु दसानी आणि शर्लिन सेठीयासोबत दिसणार आहे.