‘मिर्झापूर 2’ च्या गोलूनं शेअर केला फर्स्ट लुक, म्हणाली- ‘भौकाल के लिए तैय्यार ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित वेब सीरीज मिर्झापूरच्या दुसऱ्या भाागतील म्हणजेच मिर्झापूर 2 चा पहिला लुक समोर आला आहे. मिर्झापूर 2 मधील गोलू म्हणजे ॲक्ट्रेस श्वेता त्रिपाठीनं मिर्झापूर 2 मधील तिचा लुक शेअर केला आहे. चाहत्यांनाही तिचा लुक आवडला आहे. इंस्टाग्रामवरून आपला लुक शेअर करताना श्वेता म्हणते, “भौकाल के लिए तैय्यार ?”

श्वेतानं शेअर केलेल्या पोस्टरमध्ये गोलू शॉर्ट हेअरमध्ये दिसत आहे. तिच्या हातात बंदूक आहे. आणि तिनं कोणावर तरी बंदूक ताणली आहे. सध्या श्वेताचा हा लुक खूप व्हायरल होताना दिसत आहे.

मिर्झापूर 2 बद्दल मीडियासोबत बोलताना श्वेता म्हणते, “मी सीरीजमध्ये नो मेकअप लुकमध्ये दिसणार आहे. आधी आम्ही शॉर्ट हेअर लुकबद्दल खूप चर्चा केली. नंतर मी केस कापण्याबद्दल विचार केला. मी विगची आयडिया रिजेक्ट केली. कारण बनारसमध्ये उन्हात शुटींग होणार होती. त्यामुळे आम्ही यावर खोल विचार केला. नंतर माझ्या दिग्दर्शकानं केस कापण्याचा सल्ला दिला.”

काही दिवसांपूर्वीच कालिन भैय्याची भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठी यांनी मिर्झापूरच्या दुसऱ्या भागाचा टीजर सोशलवर शेअर केला होता. मिर्झापूर 2 चा टीजरही खूप चर्चेत राहिला. तेव्हापासून चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.