‘अर्जुन रेड्डी’ सिनेमातील अभिनेत्रीचा ‘कॅमेरामन’ श्याम नायडूंवर फसवणुकीचा आरोप ! पोलिसांनी केली ‘अटक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   साऊथ सिनेमातील प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर श्याम के नायडू यांच्यावर अॅक्ट्रेस सई सुधा हिनं फसवणुकीचा आरोप केला आहे. अॅक्ट्रेसच्या तक्रारीनंतर श्याम के नायडू यांना अटक करण्यात आली आहे. सई सुधा हिनं अर्जुन रेड्डी या सिनेमात काम केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सई सुधा हिनं एसआर नगर पोलीस ठाण्यात नायडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सुधाचा आरोप आहे की, श्याम के नायडू यांनी लग्नाचं वचन देत तिच्यासोबत रिलेशन ठेवलं होतं. परंतु नंतर तिला धोका दिला, फसवणूक केली. समोर आलेल्या माहितीनुसार, एसआर नगर पोलिसांनीच श्याम के नायडूंना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सई सुधा हिनं मंगळवारी (दि 26 मे 2020) श्याम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आज सकाळी पोलिसांनी श्याम यांना अटक केली.

श्याम के नायडू यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर छोटा के नायडू यांचे बंधू आहेत. पोकिरी या सिनेमासाठी त्यांना ओळखलं जातं. हा सिनेमा 2006 साली रिलीज झाला होता. बिजनेसमन या सिनेमासाठी त्यांना बेस्ट सिनेमेटोग्राफरसाठी नॉमिनेशन मिळालं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like