‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम सोबत अनिल कपूरच्या फोटोचा सोनमनं केला ‘बचाव’, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सोनम कपूरनं शाहीन बागवरील गोळीबारावर प्रतिक्रिया दिल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल केलं होतं. काहींनी तर मोस्ट वॉन्टेड आतंकवादी दाऊद इब्राहिम आणि अनिल कपूरचा फोटोही तिला टॅग केला आहे. अनेकांनी या फोटोवरून सवाल उपस्थित केले होते. या सगळ्याला आता सोनमनं प्रत्युत्तर दिलं आहे.

एकानं ट्विट करत सोनमला म्हटलं की, “तू नेहमीच खूप प्रखरतेनं आवाज उठवत असतेस. कृपया देशाला सांगतेस का की, दाऊदसोबतच्या तुझ्या वडिलांच्या फोटोचा संबंध त्यांच्या कर्माशी आहे की त्यांच्या धर्माशी ?” या युजरनं तीला या फोटोवर उत्तरही मागितलं आहे. सोनमनंही याचं बिंधास्तपणे उत्तर दिलं आहे. सोनमनं या युजरला उत्तर देताना म्हटलं की, “ते राज कपूर आणि कृष्णा कपूरसोबत मॅच पाहण्यासाठी गेले होते. मला असं वाटतं की, कोणाकडे बोट दाखवणं तुम्ही बंद करायला हवं. कारण असं केल्यास इतर 3 बोटं ही तुमच्याकडे असतात. मला आशा आहे की भगवान राम तुम्हाला वाईट कृत्याबद्दल आणि हिंसाचार पसरवल्याबद्दल माफ करो.”

सध्या सोनमचं हे ट्विट सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं जामिया मिलिया विद्यापीठ आणि शाहीन बागमधील हवेत झालेल्या गोळीबारावर आपली प्रतिक्रिया दिली होती. हे विभाजनकारी खतरनाक राजकारण थांबवा. कारण यामुळे फक्त तिरस्कार पसरतो असं सोनम म्हणाली होती.