श्रीदेवीच्या जीवनातील अनेक रहस्यांची ‘उकल’ ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्या नटखट अंदाजांनी सर्व भारतीयांना घायाळ करणारी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी : गर्ल वुमन सुपरस्टार’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. लेखक – पटकथा लेखक सत्यार्थ नायक लिखित हे पुस्तक पेंग्विन हाऊस इंडिया प्रकाशित करणार आहे. पेग्विंन रॅंडम हाऊसच्या एबरी प्रेस अंतर्गत ऑक्टोबर २०१९ मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. याबाबत श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी परवानगी दिली असून पेग्विंन हाऊस इंडियाने प्रकाशनाबाबत नुकतीच घोषणा केली केली आहे.

पेंग्विनकडून मिळालेल्या माहितीनुसार या पुस्तकात श्रीदेवी यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. पुरुषप्रधान भारतीय चित्रपटसृष्टीत एक महिला कशी स्टार बनू शकते याबातच्या सर्व धारणा त्यांनी बदलल्या. सध्या हे पुस्तक ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. लेखक सत्यार्थ म्हणाले की, “मी श्रीदेवी यांचा प्रशंसक आहे. या पुस्तकामुळे चित्रपटासृष्टीच्या पडद्यावरच्या एका प्रतिभावान कलाकराच्या आयुष्याचा प्रवास लिहीण्याची संधी मिळाली. पुस्तक लिखाण काळात अनेक दिग्गजांसोबत बोलण्याचा अप्रतिम अनुभव होता. या काळात मी त्या सर्व दिग्गजांना भेटलो ज्याच्यासोबत श्रीदेवी यांनी काम केले, त्याच्याशी जोडलेल्या आठवणी त्यांनी मला अगदी दिलखुलासपणे सांगितल्या. या पुस्तकात एका बालकलाकारापासून भारताची पहिली महिला सुपरस्टार बनण्याचा श्रीदेवी यांच्या प्रवास दर्शविला आहे.”

दुःखाची बाब अशी की, फेब्रुवारी २०१८ ला दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like