Video : ‘बेबी डॉल’ सनी लिओनी ‘रॅपर’ हनी सिंगसाठी बनली ‘हॉट जलपरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बेबी डॉल आणि हॉट अॅक्ट्रेस सनी लिओनीने अनेक सिनेमात अभिनय केला आहे. शिवाय आयटम नंबरही केले आहेत. लवकरच ती झूठा कही का या सिनेमातील रॅपर हनी सिंगच्या गाण्यात दिसणार आहे. नुकताच त्या गाण्याचा टीजर रिलीज झाला आहे. रिलीज होताच हा टीजर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामागचे कारण म्हणजे हनी सिंग आणि सनी लिओनी. या गाण्याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या गाण्यातून हनी सिंग लाँग टाईमनंतर वापसी करत आहे.

या गाण्यातील टीजर पाहून लक्षात येतं की, यात हनी सिंगचं फंक लव गाणं रिवाईव करण्यात आलं आहे. खास बात अशी आहे की, सनी लिओनी या गाण्यात वेगळ्या अवतारामध्ये दिसत आहे. सनी लिओनी या गाण्यात जलपरी बनली आहे. अनेक लहान मुलेही या गाण्यात दिसत आहेत.

सनी लिओनीने याआधीही रागिनी एमएमएस २ मधील चार बोतल वोडका या गाण्यात हनी सिंग सोबत काम केलं आहे. सध्या रिलीज झालेल्या गाण्याचा टीजर व्हायरल होत आहे. थायलंड मध्ये हे गाणं शुट झालं आहे. खूप सुंदर असं लोकेशन पाहून या गाण्याची शुटींग झाली आहे. २०१८ हनी सिंगसाठी खूप चांगलं वर्ष ठरलं आहे. त्याने दिल चोरी, छोटे छोटे पेग, दिस पार्टी इज ओवर नाउ आणि शाहिद कियारावर शुट करण्यात आलेलं उर्वशी यांसारखे अनेक चार्टबस्टर गाणे दिले आहेत.

ऋषी कपूर लाँग टाईमनंतर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे. यात सनी सिंग, जिमी शेरगिल, ओंकार कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलर पाहिला तर लक्षात येतं की, यात जबरदस्त फॅमिली ड्रामा, खूप सारा खोटापणा, आणि कॉमेडीचा तडका आहे. समीप कांग यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

 

Loading...
You might also like