‘बेबी डॉल’ सनीनं शेअर केला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ ! ‘अशा’ प्रकारे ठेवते स्वत:ला फिट ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या हॉट फोटोंमुळं चर्चेत येताना दिसत आहेत. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिनं सपाटाचं लावला आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. पुन्हा एकदा सनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे. यात सनी एक्सरसाईज करताना दिसत आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सनी लेग्स आणि बुटी वर्कआऊउट करत आहे जो स्लिम राहण्यास मदत करतो. सनीचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.

व्हिडीओ शेअर करताना सनीनं खास कॅप्शनही दिलं आहे. व्हिडीओ शेअर करताना सनी म्हणते, “लेग्स आणि बुटी वर्कआऊट अजिबात सोपं नसतं.” याआधीही सनीचा सायक्लिंगचा व्हिडीओ समोर आला होता जो व्हायरल झाला होता.

कॉविडपासून बचाव करण्यासाठी आपल्या कुटुंबासाठी सनी अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच गेली आहे. सनीनं अमेरिकेला गेल्यानंतर सोशलवर एक पोस्टही शेअर केली होती ज्यात तिनं अमेरिकेला जाण्यामागील कारण सांगितलं आहे.