सुशांत सिंह राजपूत सुसाईड केस : वकिलानं मुंबई पोलिसांकडे पत्राद्वारे केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. आता राजकीय लोकही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करताना दिसत आहेत. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पीएम मोदींना पत्र लिहिल्यानंतर आता या प्रकरणानं नवीन वळण घेतलं आहे.

सुब्रमण्यम स्वामींनीच सोशलवरून माहिती दिली होती की, सुशांतची केस त्यांचे सहकारी आणि वकिल दिल्लीतील इशकरण सिंह भंडारी पहात आहे. वकिल भंडारी हेही सोशलवर सक्रिय आहेत. या केससंदर्भात काही गोष्टीही ते ट्विटरवरून शेअर करताना दिसत आहे. अलीकडेच भंडारी यांनी मुंबई पोलिसांना लेटर लिहिलं आहे आणि जोपर्यंत सुशांतच्या केसचा तपास संपत नाही तोपर्यंत त्याचं घर सील ठेवावं अशी मागणी केली आहे.

https://twitter.com/ishkarnBHANDARI/status/1283698371245432837?s=20

वकिलानं केली ‘ही’ मागणी
या केसबद्दल बोलताना भंडारींनी सांगितलं की, “सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या केसमध्ये अनेक लोक न्यायाची आस लावून बसले आहेत. म्हणून मी ही केस लीगली घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून याची सीबीआय चौकशी केली जावी. काही सकारात्मक गोष्टी होताना दिसत आहेत. परंतु अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. परंतु न्याय होणार.” आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी माहिती दिलीय की, “आम्ही मुंबई पोलिसांना लेटर लिहून ही मागणी केलीय की, सुशांतच्या केसचा जोपर्यंत तपास सुरू आहे तोपर्यंत सुशांतचं घर सील ठेवलं जावं.”

https://twitter.com/ishkarnBHANDARI/status/1283997391935291392?s=20