पोलीस कोठडीतील पिता-पुत्राचा मृत्यू , पोलिसांचं गुणगानं करणारे सिनेमे केल्याचा ‘सिंघम’च्या डायरेक्टरला पस्तावा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तमिळनाडूमधून समोर आलेल्या एक चकित करणाऱ्या घटनेनं सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. सथनकुलममध्ये पोलीस कस्टीड असलेल्या पिता-पुत्राचा जयराज आणि बेनिक यांचा मृत्यू झाल्यानं लोक प्रचंड भडले आहेत. साऊथ इंडस्ट्रीत पोलिसांचं गुणगान करणारे सिनेमे तयार करण्यासाठी फेमस असणारे डायरेक्टर हरी हे देखील खूप नाराज आहेत.

28 जून रोजी हरी यांनी एक नोट शेअर करत लिहिलं की, “सथनकुलममध्ये जे काही झालं ते पुन्हा तमिळनाडूत कधी पहायला मिळावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. काही पोलीस अधिकाऱ्यांमुळं पूर्ण डिपार्टमेंट बदनाम होतं. ज्या लोकांनी हे केलं आहे त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे.” सोबतच हरी असंही म्हणाले की त्यांना आता याचा पस्तावा वाटत आहे की, त्यांनी इंडस्ट्रीत पोलिसांचं गुणगान गाणारे सिनेमे तयार केले आहेत. त्यांची ही नोट तमिळ भाषेत आहे.

नेमकं प्रकरण काय ?
एका इंग्रजी वृत्तानुसार, 62 वर्षीय पी जयराज आणि 32 वर्षीय मुलगा बेनिक यांची एक मोबाईल शॉपी आहे. 19 जून रोजी हे दोघं तिथंच होते. याचवेळी कोणतीरी पोलिसात तक्रार केली की, लॉकडाऊनच्या नियमांच उल्लंघन करत दोघांनी मोबाईल शॉपी चालू केली आहे. यानंतर पोलिसांना या पिता-पुत्रांना अटक केली. आता त्या पिता-पुत्रांचा मृत्यू झाल्यानंतर असा आरोप होत आहे की, पोलिसांच्या माराहणीमुळंच त्यांचा मृत्यू झाला आहे.