Jayaprakash Reddy Death : टॉलिवूड अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दक्षिण भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे शेवटचा श्वास घेतला. मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. जयप्रकाश रेड्डी यांना तेलुगू चित्रपटांच्या प्रेक्षकांमध्ये विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रह्मपुत्रुदुपासून केली होती.

जयप्रकाश रेड्डी यांच्या मृत्यूची बातमी समजताच टॉलीवूडसह बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली व शोक व्यक्त केला जात आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनीही जयप्रकाश यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जयप्रकाश हृदयविकाराचा झटका आल्याने बाथरूममध्ये पडले होते. रेड्डी कुर्नूलमधील अल्लागड्ड्याचे होते. त्यांनी ब्रह्मपुत्रूदु या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आणि १९८० च्या दशकात अनेक चित्रपटात छोट्या भूमिकांमध्ये काम केले. पण त्यांना बालकृष्ण स्टारर समरसिम्हा रेड्डीकडून ओळख मिळाली.

तेलुगू चित्रपट प्रेक्षकांमध्ये जयप्रकाश रेड्डी यांना जेपी म्हणून ओळखले जायचे. एक विनोदी अभिनेता तसेच ते जयम मनाडे रा आणि चेन्नेकेसा रेड्डी यासारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी देखील ओळखला जायचे.