टायगर श्रॉफची बहिण कृष्णा हिनं केलं नाही लग्‍न, बॉयफ्रेन्डच्या पोस्टला दिलं ‘हे’ उत्‍तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या प्रियकराच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड इबानने कृष्णाला आपल्या एका पोस्टमध्ये ‘Wifey’ म्हणून लिहिले होते. तेव्हापासून असा अंदाज लावला जात आहे की, कृष्णा आणि इबान यांनी गुपचूप लग्न केले आहे. जेव्हा ही बातमी कृष्णाला कळाली, तेव्हा तिने लग्नाची बातमी चुकीची आहे असे म्हटले.

एका मुलाखतीमध्ये बोलताना कृष्णा म्हणाली की, हे किती हास्यस्पद आहे.  Wifey फक्त एक शब्द आहे. यामुळे कीती वेगळा अंदाज लावला जात आहे की आम्ही गुप्तपणे लग्न केले. ही गोष्ट इतकी वाढली होती की माझी आई आयशा श्रॉफने देखील मला हे काय चालले आहे ? असे विचारले होते.

कृष्णाने सांगितले की, इबान आणि टायगर हे अनेकवेळा एकत्र बास्केटबॉल खेळले आहे. याआधीही इबानलाही हे माहित नव्हते की टायगरला कोणती बहीण आहे. कृष्णाला जेव्हा विचारले की, इबानला चित्रपटात आपले नशीब आजमावयाचे आहे का ? तेव्हा कृष्णा म्हणाली की, त्याला चित्रपटांमध्ये रस आहे. पण याक्षणी तो फक्त स्पोर्ट्समध्ये आहे. याशिवाय तो स्वत: चे संगीतही बनवतो. लॉस एंजेलिस आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्याने अनेक प्रकल्पांमध्ये काम केले आहे.

Loading...
You might also like