अभिनेत्री भूमी पेडणेकरला ६ वीत ‘क्रश’ तर १६ व्या वर्षीच बनला ‘बॉयफ्रेंड’ ; ५ रंगीन ‘किस्से’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भूमी पेडणेकरने आज (गुरुवार दि १८ जुलै) आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतरच भूमीने चर्चेत रहायला सुरुवात केली होती. विषय सिनेमाच्या निवडीचा असो किंवा मग तिच्या भूमिकेचा असो, भूमी नेहमीच सर्वांचं मन जिंकत आली आहे. तिच्या वाढदिवसाच्या या खास दिवशी आज आपण भूमीचे काही न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत.

करिअरसाठी असिस्टेंट कास्टींग डायरेक्टर म्हणून काम केले
भूमीने आयुष्मान खुरानाच्या ‘दम लगाके हईशा’ सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. परंतु भूमीला हा सिनेमा तितका सहज नव्हता मिळाला. अ‍ॅक्टींगमध्ये करिअर करण्यासाठी भूमीने यशराज फिल्म्समध्ये असिस्टेंट कास्टींग डायरेक्टर म्हणून काम केले होते. भूमीचा पहिला बॉस अभिमन्यू रे होते, नंतर मात्र भूमीने शानू शर्मासोबत काम केले. भूमीने चक दे इंडिया, रॉकेट सिंह- सेल्समन ऑफ द ईयर, तीन पत्ती या सिनेमांसाठी कास्टींग केले आहे.

भूमीला पहिल्या सिनेमासाठी फोन आला तेव्हा…
भूमीने अनेक सिनेमांसाठी ऑडिशन दिले होते परंतु नशीबाने तिला साथ दिली नाही. विशेष बाब अशी की, दम लगाके हईशा साठी जेव्हा भूमीला फोन आला तेव्हा त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता. याशिवाय या सिनेमासाठी तिने २५-३० किलो वजन वाढवले होते. या सिनेमासाठी भूमी ९० किलोची झाली होती. आधी तिचे वजन ६५ किलो होते.

image.png

शाळेत चीटींग करताना पकडली गेली
भूमी पेडणेकर शाळेत चीटींग करताना पकडली गेली होती. यानंतर तिच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आलं होतं. शिक्षकांनी पालकांना सांगितले की, ती पुस्तकाचा वापर करत चीटींग करत होती. रिपोर्ट्सनुसार, भूमीने कमाल आर खानचा देशद्रोही हा सिनेमा तब्बल १०० वेळा पाहिला आहे.

नशेत झिंगत केला ५ तास डान्स
भूमीने हॉलिबॉलच्या नावावर अनेकदा शाळा बुडवली आहे. १९ वर्षांची असताना भूमी नशेत झिंगली होती. नशेत झिंगत तिने कॉलेजच्या पार्टीत ४-५ तास डान्स केला होता.

६ वीत पहिला क्रश आणि १६ व्या वर्षी पहिला बॉयफ्रेंड
भूमी ६ वीत असताना तिचा पहिला क्रश तिचा सिनीयर होता. तो मुलगा त्यावेळी स्पोर्ट्स कॅप्टन होता. भूमीला वयाच्या १६ व्या वर्षीच पहिला बॉयफ्रेंड होता. दोघेही सोबत सिनेमा पहायला गेले होते.

Loading...
You might also like