home page top 1

आयुष्मानच्या ‘बाला’ सिनेमाच्या टीजरवर UP पोलिसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच आयुष्मान खुराणाच्या बाला सिनेमाचा टीजर रिलीज झाला. टीजर पाहून लक्षात येतं की, या सिनेमात तो टक्कलच्या समस्येशी झुंजताना दिसणार आहे. टीजरमध्ये दिसत आहे की, टक्कल लपवण्यासाठी आयुष्मान टोपी घालतो. परंतु हवा येते आणि त्याचा टक्कल उघडा पडतो. यामुळे तो निराश होतो. या टीजरवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांची प्रतिक्रिया खूपच मजेदार आणि वेगळी आहे.

बालाचा टीजर रिट्विट करत युपी पोलिसांनी लिहलं की, “जर हेल्मेट घातलं असतं तर हे नसतं झालं. That is why, one must always wear helmet!” या पोस्टमध्ये युपी ट्राफिक पोलिसांनाही टॅग करण्यात आलं आहे. सोबतच यामध्ये  #BalaTeaser#RoadSafety असा हॅशटॅगही वापरला आहे. युपी पोलिसांनी संदेश दिला आहे की, गाडी चालवताना हेल्मेट घालणं गरजेचं आहे. युपी पोलिसांच्या ट्विटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

57 सेकंड्सचा बाला सिनेमाचा टीजर खूपच फनी आहे. हा टीजर पाहता लक्षात येतं की, आयु्ष्मान या सिनेमात आपल्या लुक आणि अ‍ॅक्टींगने कमाल करणार  आहे. या सिनेमात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि यामी गौतमी दिसणार आहेत. हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like