अभिनेत्री उर्वशी रौतेलानं इंटरनेटवर शेअर केला Mobile Number !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सुपर अ‍ॅक्टिव असते. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ अटेंशन घेत आहेत. ती कायमच बिकिनीत दिसत असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळंही उर्वशी चर्चेत असते. आता उर्वशीची एक इंटरेस्टिंग पोस्ट समोर आली आहे. ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. यात तिनं चक्क तिच्या मोबाईल नंबरचा खुलासा केला आहे.

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तिच्या हातात एक बोर्ड दिसत आहे. यात नाव, शूटिंग डेट असे काही डिटेल्स दिसत आहेत. यात शेवटी तिनं मोबाईल नंबरही लिहिला आहे. 95206829 अशा काही अंकांचा यात समावेश आहे.

उर्वशीच्या या मोबाईल नंबरमध्ये शेवटचे दोन अंक गायब आहेत. यात फक्त आठच अंक दिसत आहेत. यानंतर इंटरनेटवर एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येकजण विचारत आहे की, शेवटचे 2 अंक कुठे गेले आहेत.

उर्वशीच्या या पोस्टबद्दल बोलायचं झालं, तर उर्वशीच्या आगामी प्रोजेक्टची ही घोषणा आहे. विशाल मिश्रा (Vishal Mishra) च्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी ती पुन्हा एकदा तयार आहे. हा एक म्युझिक व्हिडिओ आहे. एक रेट्रो विंटेज मिक्स साँग वो चांद कहां से लाओगी वरून हे गाणं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाण्याची चर्चा सुरू आहे. यात उर्वशी रौतेला आणि मोहसिन खान (Mohsin Khan) यांनी काम केलं आहे.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसली. याशिवाय तिनं एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडिओत आणि पागलपंती सिनेमातही काम केलं आहे. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भुल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.

You might also like