Chehre Movie Trailer : इमरान हाश्मी सोबत अमिताभ बच्चनचा जबरदस्त खेळ, ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्तीही ‘एन्ट्री’ (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी स्टारर ‘ चेहरे’ या चित्रपटाचा ट्रेलर 18 मार्च रोजी रिलीज झाला. चेहरे हा एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे, जो सस्पेन्स वाढवण्यात यशस्वी ठरला आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आपल्या फॉर्ममध्ये दिसून आले आहेत. बिग बीच्या आवाजात बोललेले संवाद ट्रेलरला आणखी प्रभावी बनवित आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरीने केले आहे. या चित्रपटाद्वारे इमरान हाश्मी प्रथमच अमिताभ बच्चन यांच्यासमवेत स्क्रीन शेअर करत आहे. ट्रेलरची सुरूवात अमिताभ बच्चनच्या व्हॉईस ओव्हरपासून होते, ज्यामध्ये ते म्हणतात की, ‘तुमच्यापैकी कुणी गुन्हा केला असेल तर सावधपणे येथून जा, कारण हा खेळ तुमच्याबरोबरही खेळला जाऊ शकतो.’

इम्रानबरोबर अमिताभचा खेळ

सुरुवातीच्या दृश्यात, एक कार बर्फाळ मार्गावर जात आहे. जिचा अपघात होतो. दृश्य बदलून हिल स्टेशनवरील जुन्या कॉटेजवर पोहोचते, तिथे इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन समोरासमोर उभे आहेत. अमिताभ आपल्या परिचयात म्हणतात की, ‘हमारी फील्ड है क्रिमिनल लॉ यानी फौजदारी’. इम्रान स्वत: चे अ‍ॅडनेसीचे प्रमुख म्हणून वर्णन करतो. या कॉटेजमध्ये अमिताभ बच्चन, रघुबीर यादव, धृतिमान चटर्जी आणि अन्नू कपूर यांचा समावेश आहे आणि असे म्हणतात की दररोज संध्याकाळी एक खेळ खेळतात.

अमिताभ म्हणतात की, ‘आमच्या खेळाच्या शेवटी न्याय मिळतो . इमरानला खेळामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. खेळात इम्रानली गुन्हेेगार बनवले जाते. खेळादरम्यान, इमरानचा भूतकाळ आणि काही रहस्ये समोर येतात आणि क्रिस्टल डिसूझा देखील दिसतो. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिले की, ‘ जब तक गुनाहगार साबित ना हो जाए, हर कोई संदिग्ध है। क्या आप खेल का सामना करने के लिए तैयार हैं’

ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्तीची एन्ट्री

विशेष म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनल पोस्टर्समधून गायब रिया चक्रवर्तीचा ट्रेलरमध्ये समावेश करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये इमरान हाश्मीसोबत तिला दाखविण्यात आले. दरम्यान, रिया सुशांतसिंह राजपूत ही मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असून ती सध्या तपास यंत्रणांच्या केंद्रस्थानी आहे.

चेहरे या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लि. केली आहे. या चित्रपटात अमिताभ आणि इम्रानशिवाय अन्नू कपूर, धृतिमान चटर्जी, रघुबीर यादव, सिद्धांत कपूर आणि क्रिस्टल डिसूझा मुख्य भूमिकेत आहेत. चेहरे 9 एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहेत.