Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये कॉमेडीयन कपिल अनेकदा फीमेल सेलेब्स सोबत फ्लर्ट करताना दिसत असतो. आजवर त्याच्या शोमध्ये अनेक कलाकार आले आहेत. कपिलचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. यावेळी दीपिकानंही काही खुलासे आहेत. यातील एक खूपच इंटरेस्टींग आहे.

गेल्या वर्षी दीपिका कपिल शर्मा शोमध्ये आली होती. यावेळी कपिलनं तिच्या सोबत गप्पा मारल्या खूप फ्लर्टींगही केली. कपिलनं तिला काही प्रश्नही विचारले होते. कपिलनं तिला विचारलं की, तुझं आणि रणवीर सिंगच्या पायाचं माप एकच आहे त्यामुळं कधी कधी तुम्ही अदलून बदलून एकमेकांचे शुज घालता असं आम्हाला कळालं आहे.

यावर उत्तर देताना दीपिका हसत आणि काहीशी लाजत म्हणते की, हो हे खरं आहे की, कधी कधी आम्ही एकमेकांचे शुज अदलून बदलून घालत असतो. दीपिकाचा या शोचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनाही हसू आवरणं मुश्किल झालं आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखली दिल्या आहेत.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.