International Woman’s Day 2020 : ‘या’ 5 अभिनेत्रींनी स्वत:च्या दमावर बनवली ‘बॉलिवूड’मध्ये ओळख

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा पुरुषांना म्हणजेच मेल अ‍ॅक्टर्सना जास्त महत्त्व दिलं जात होतं. आता अ‍ॅक्ट्रेसही काही कमी नाहीत असं दिसत आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अ‍ॅक्ट्रेस आहेत ज्यांनी आपली ओळख तर निर्माण केलीच परंतु महिलांना प्रेरीतही केलं. जाणून घेऊयात त्या अ‍ॅक्ट्रेसबद्दल.

1) प्रियंका चोपडा-
प्रियंका चोपडा एक इंटरनॅशनल स्टार बनली आहे. तिनं अ‍ॅक्टींगसोबतच स्वत:च प्रॉडक्शन हाऊसही सुरू केलं आहे. यात ती अनेक छोट्या बजेटचे सिनेमे बनवत असते.

https://www.instagram.com/p/B8X6r8Op0yp/?utm_source=ig_embed

2) कंगना रणौत-
कंगनानं स्वत:च्या दमावर बॉलिवूडमध्ये आपली ओळख तयार केली आहे. अ‍ॅक्टींगसोबतच कंगनानं डायरेक्शनमध्येही पाऊल टकालं आहे. तिच्या सिनेमांमध्ये अ‍ॅक्टरपेक्षा अ‍ॅक्ट्रेसवर जास्त फोकस असतो.

3) दीपिका पादुकोण-
आपल्या प्रत्येक सिनेमातून दीपिका चाहत्यांचं मन जिंकत असते. ती कोणतीही स्टार किड नाही तरीही तिनं आपल्या मेहनतीनं बॉलिवूडमध्ये आपली ओळख तयार केली आहे. तिनं प्रॉडक्शनमध्येही पाऊल टाकलं आहे.

https://www.instagram.com/p/B7vU-RwDZfm/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B9Y5dnJjLxQ/

https://www.instagram.com/p/B63eWJKDwfJ/

4) तापसी पन्नू-
तापसनीनं साऊथ सिनेमात काम करत आपली ओळख तयार केली होती. तरीही बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी तापसीनं खूप परिश्रम घेतले. यासाठी तिला वेळ लागला.

5) अनुष्का शर्मा-
बॉलिवूडमधील सक्सेसफुल अ‍ॅक्ट्रेसेसमध्ये अनुष्का शर्माचं नाव घेतलं जातं. तिनं सिनेमे प्रोड्युस करायलाही सुरुवात केली आहे. ती एक ब्रँड नुशदेखील आहे.