मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bombay High Court | लग्न झालेल्या महिलेने परपुरुषासोबत सहमतीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले तर तो बलात्कार (Rape) म्हणता येणार नाही, असं मत मुंबई हायकोर्टाने नोंदवलं आहे. एवढंच नाही तर महिलेने तिच्या प्रियकरावर (Boyfriend) दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा देखील न्यायलयाने रद्द केला. मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) एका याचिकेवर हा निर्वाळा दिला आहे.
तक्रारदार महिला आणि याचिकाकर्ता पुरुष यांची 2020 मध्ये ओळख झाली होती. दोघेही विवाहित (Married) असून त्यांना प्रत्येकी दोन मुले आहेत. ओळखीनंतर कालांतराने त्यांच्यामध्ये प्रेम संबंध (Love Affair) जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात एवढे बुडाले की त्यांच्यात अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
याच दरम्यान महिलेच्या पतीला आणि तिच्या प्रियकराच्या पत्नीला या दोघांच्या विवाहबाह्य संबंधांची (Extramarital Affair) माहिती मिळाली. 2021 मध्ये महिलेच्या घरात शारीरिक संबंध ठेवत असताना तिच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडले. या प्रकरानंतर महिलेच्या पतीने तिला घरातून हकलून दिले.
त्यामुळे महिलेने प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, प्रियकराने आपण आधीच विवाहित असल्याने लग्न करु
शकत नाही, असं म्हणत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
लग्नाचे वचन देऊन प्रियकराने जबरदस्तीने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला.
महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. याविरोधात प्रियकराने थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले.
आम्ही दोघेही विवाहित असून सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते, अशी याचिका महिलेच्या प्रियकराने कोर्टात
(Bombay High Court) दाखल केली. या याचिकेवर कर्टात सुनावणी देताना दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला.
विवाहित असून देखील महिलेने परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवले. प्रियकर देखील विवाहित आहे,
याची माहिती महिलेला होती. त्यामुळे या कृतीला बलात्कार म्हणता येणार नाही, असे मत कोर्टाने नोंदवत
महिलेने प्रियकराविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा