Bombay High Court | फुरसुंगी आणि ऊरळी देवाची नगरपरिषदेचा भवितव्याचा निर्णय लांबणीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फुरसुंगी (Fursungi) आणि उरुळी देवाची (Uruli Devachi) या स्वतंत्र नगरपरिषदेच्या (Municipal Council) भवितव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल असलेल्या जनहित याचिकेवर (Public Interest Litigation (PIL) आज (गुरुवार) निर्णय अपेक्षित होते. राज्य सरकारने (State Government) घेतलेला निर्णय मागे घेतला जाणार की नाही, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज निर्णय होणार होता. मात्र, आजच्या सुनावणीत यावर निर्णय झालेला नाही. न्यायालयात पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महानगरपालिकेतून वगळ्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 6 डिसेंबर 2022 रोजी घेतला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने (Urban Development Department) केलेली कायदेशीर प्रक्रिया कायद्याला धरुन सल्याचे बुधवारी (दि.9) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) समोर आले. त्यामुळे ही दोन गावे पुणे महानगरपालिकेतून वगळण्याची 31 मार्च 2023 रोजीची प्रारुप अधिसूचना राज्य सरकारला मागे घ्यावी लगाण्याची शक्यता आहे.

पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) विरोधी पक्षनेते उज्वल केसकर (Ujwal Keskar),
प्रशांत बधे (Prashant Badhe), रणजित रासकर (Ranjit Raskar), अमोल हरपाळे (Amol Harpale) यांनी
राज्य सरकारच्या स्वतंत्र नगरपरिषदेच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय (Justice Devendra Kumar Upadhyay) आणि
न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर (Justice Arif S. Doctor) यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गावांच्या नगरपरिषदेच्या भवितव्याची सुनावणी पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली, मात्र निर्णय झाला नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bath In Fever | वायरल तापात आंघोळ करावी की नाही? डॉक्टरांनी सांगितले सत्य, चुकूनही करू नका ‘हे’ काम

Tushar Gandhi | वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींची डेक्कन पोलिसांकडे तक्रार (व्हिडीओ)