Bath In Fever | वायरल तापात आंघोळ करावी की नाही? डॉक्टरांनी सांगितले सत्य, चुकूनही करू नका ‘हे’ काम

नवी दिल्ली : Bath In Fever | पावसाळ्यात अनेक आजार वाढतात. वायरल तापाने अनेकजण त्रस्त असतात. डेंग्यू हा सुद्धा एक प्रकारचा वायरल ताप असून तो जीवघेणा ठरू शकतो. ताप आल्यावर लोक आंघोळ करणे टाळतात. अनेकांचे असे मत असते की, तापामध्ये आंघोळ करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. याबाबत डॉक्टरांकडून सत्य जाणून घेऊया (Should Be Take Bath When Sick).

नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉ. सोनिया रावत यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली की, ताप आल्यावर आंघोळ करण्यात कोणतीही अडचण नाही आणि सर्व लोक असे करू शकतात. ताप आला की शरीराचे तापमान वाढते आणि शरीरात वेदना होतात. तापामुळे शरीरात अशक्तपणा येतो आणि आंघोळ करावीशी वाटत नाही. (Bath In Fever)

मात्र, अशावेळी कोमट पाण्याने आंघोळ करणे खूप फायदेशीर ठरू शकते. आंघोळ केल्याने ताप कमी होतो. स्नायूंना आराम मिळतो. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने अंगदुखी दूर होते. ताप खूप असला तरी खूप थंड पाण्याने आंघोळ करू नये. असे करणे हानिकारक ठरू शकते. (Bath In Fever)

तापात आंघोळ करणे शक्य नसेल तर काय करावे?

अनेकदा तापामुळे प्रकृती खालावते आणि उठायला-बसायला त्रास होतो. अशावेळी आंघोळ करणे शक्य नसेल तर काय करावे? या प्रश्नावर डॉ. सोनिया रावत यांनी सांगितले की, जर तापात आंघोळ करायची नसेल तर थंड पाण्याने टॉवेल ओला करून अंग पुसून घ्या.

यामुळे देखील तापात काही प्रमाणात आराम मिळेल आणि शरीरातील जडपणा निघून जाईल.
ओल्या टॉवेलने शरीर पुसणे अजिबात हानिकारक नाही. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मात्र, हे करत असताना बर्फाचे पाणी वापरू नये. बर्फाचे पाणी आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

ताप आल्यावर कोणते औषधे घेणे सुरक्षित?


डॉक्टरांच्या मते, ताप आल्यास फक्त पॅरासिटामॉलच्या गोळ्या घ्याव्यात.
दोन-तीन दिवसानंतरही ताप बरा होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ब्लड टेस्ट करा.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासह अनेक आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.
अशावेळी दुर्लक्ष होता कामा नये.
तापाकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती जास्त बिघडू शकते आणि रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Milk With Ghee | रात्री झोपताना दुधात ‘या’ वस्तू मिसळून करा सेवन, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत,
वाढेल ताकद

Air Pollution | वायु प्रदुषणामुळे वाढतो ‘या’ घातक आजाराचा धोका, प्राथमिक लक्षणं जाणून घेऊया

Diabetes Diet | ब्लड शुगर हाय असेल तर फॉलो करा ‘हा’ विशेष प्रकारचा डाएट,
रिझल्ट पाहून व्हाल आश्चर्यचकीत!