Tushar Gandhi | वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींची डेक्कन पोलिसांकडे तक्रार (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Tushar Gandhi | काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले होते. यावरुन राजकीय वातावरण तापले (Maharashtra Political News) असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी तक्रारी अर्जद्वारे केली आहे. यावेळी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी (Kumar Saptarshi), अ‍ॅड. असीम सरोदे (Adv. Aseem Sarode), अनवर राजन (Anwar Rajan) हे देखील उपस्थित होते.

तुषार गांधी (Tushar Gandhi) म्हणाले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी याआधी अनेक वेळा वादग्रस्त विधानं केली आहेत. महात्मा गांधी यांच्याबद्दल देखील विधान केली आहेत. मात्र आता महात्मा गांधी यांच्या आईबद्दल केलेले विधान ऐकल्यावर खूप दु:ख झाले आहे. त्यानंतर राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. याप्रकरणी कडक पावलं उचलू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिले आहे.

संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान करून महिनाभराचा कालावधी होऊन गेला.
विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन देऊन 15 दिवस झाले.
तरीदेखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. संभाजी भिडे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान
केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कारवाई करावी. अन्यथा आम्ही न्यायालयामध्ये धाव घेऊ असा इशारा तुषार गांधी
यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bath In Fever | वायरल तापात आंघोळ करावी की नाही? डॉक्टरांनी सांगितले सत्य, चुकूनही करू नका ‘हे’ काम

Benefits Of Giving Up Wheat | 1 महिन्यापर्यंत गहू आणि मैद्याचे पदार्थ खाणे सोडा, शरीरात होतात ‘हे’ विशेष बदल