‘हा’ ऑस्कर विजेता बॉण्ड चित्रपटात विलनच्या भूमिकेत 

मुंबई : वृत्तसंस्था – बॉण्ड पटाचे जगभरात चाहते आहे. आज ‘जेम्स बॉण्ड’ही सर्वात जास्त लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक बनली आहे. पाच दशकाहून या बॉण्ड चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटांना सुपरहिट बनवले. लवकरच जेम्स बॉण्ड चित्रपट मालिकेतील २५ वा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ऑस्कर विजेता रॅमी मॅलेक प्रमुख खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे.

अभिनेता रॅमी मॅलेकला ऑस्कर २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. रॅमीला हा ऑस्कर ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ याचित्रपटासाठी मिळाला. याचित्रपटात त्याने रॉकस्टार फ्रेडी मर्क्युरीची भूमिका साकारली होती. रॅमीने याआधी नीड फॉर स्पीड, नाइट अ‍ॅट द म्यूझियम, द मास्टर यांसारख्या चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण याचित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आणि याच लोकप्रियतेमुळे त्याची बॉण्डपटामध्ये निवड करण्यात आली आहे.

जेम्स बॉण्डचा अगामी चित्रपट नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील खलनायची भूमिका निश्चित झाली असली तरी गेले दोन वर्ष जेम्स बॉण्ड साकारत असलेला अभिनेता डॅनियल क्रेगबाबतही निर्माते संभ्रमात होते. लेखक रॉबर्ट वेड यांचा डॅनियल क्रेगला विरोध होता. त्यांच्या मते डॅनियल एक उत्तम अभिनेता असून बॉण्ड व्यक्तिरेखा त्याने चांगल्या प्रकारे साकारली आहे, परंतु कथानकाचा विचार करता त्याचे आणि व्यक्तिरेखेचे वय यात तफावत आहे, म्हणून त्यांचा क्रेगला विरोध होता. पण दिग्दर्शक मार्टिन कॅम्पबेल त्यांच्या मते तो अनुभवी असून या भूमिकेसाठी तोच योग्य आहे. लेखक, दिग्दर्शक व निर्मात्यांमध्ये सुरु असलेला हा वाद शेवटी चाहत्यांमुळे मिटला. डेनियलची जेम्स बॉण्ड म्हणून असलेली लोकप्रियता पाहुन पुन्हा एकदा त्याची चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे.