Bonus Share | १ वर १ शेअर बोनस देतेय कंपनी, एक्स-बोनस डेट आज, डिटेल्स जाणून घ्या

नवी दिल्ली : बोनस शेअर (Bonus Share) खरेदी करणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी (Investor) गुड न्यूज आहे. शेअर बाजारात (Stock Market) आज GNA Axles Ltd एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत आहे. कंपनी आपल्या योग्य गुंतवणुकदारांना प्रत्येक शेअरवर १ शेअर बोनस (Bonus Share) म्हणून देत आहे.

गुरुवारी GNA Axles Ltd च्या एका शेअरची किंमत बाजार बंद होण्याच्या वेळी ३.२९ टक्के तेजीसह १०२४.९५ रुपयांच्या स्तरावर होती.

रेकॉर्ड डेट कधी?
११ जुलैला झालेल्या GNA Axles Ltd च्या बोर्ड मीटिंगमध्ये ठरले की, १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या एका शेअरवर योग्य गुंतवणुकदारांना एक शेअर बोनस म्हणून दिला जाईल. कंपनीने या बोनस शेअरची पात्रता ठरवण्यासाठी २ सप्टेंबर २०२३ ची तारीख रेकॉर्ड डेट घोषित केली होती. कारण बाजार उद्या शनिवारी बंद राहिल. यासाठी आज १ सप्टेंबरची तारीख महत्वाची ठरते. (Bonus Share)

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी?
शेअर बाजारात GNA Axles Ltd ने मागील एक वर्षात ४० टक्केपेक्षा जास्त रिटर्न गुंतवणुकदारांना दिला आहे.
तर, मागील ६ महिन्यात हा स्टॉक १२ टक्केपेक्षा जास्त वाढला आहे. एनएसईमध्ये GNA Axles Ltd चा ५२ आठवड्याचा उच्चांक १०६४.९० रुपये प्रति शेअर आहे. कंपनी केवळ एनएसईमध्ये लिस्टेड आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?, भाजपकडून हालचालींना वेग (Video)

One Nation One Election | ‘वन नेशन वन इलेक्शन’ मोहिमेवरून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपाला टोला; “इंडिया आघाडीला घाबरुनच…”