Booster Dose Planning | महाराष्ट्रात कधी दिले जाणार बूस्टर डोस? अजित पवार म्हणाले…

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Booster Dose Planning | कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊनही अनेकांना संसर्ग होत असल्याने आता बुस्टर डोसची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. त्यातच परदेशांमध्ये नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose Planning) दिले जात आहेत. शिवाय, काही दिवसापूर्वी सिरमचे सायरस पूनावाला यांनी सुद्धा ही गरज जाहीरपणे बोलून दाखवली होती. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनीही भाष्य केले आहे. राज्यात बूस्टर डोस कधी दिले जाणार, याबाबतचे नियोजन (Planning on when the booster dose will be given in the state) त्यांनी स्पष्ट केले. करोनासंदर्भातील आढावा बैठकीनंतर पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अगोदर दोन डोस पूर्ण करणार

अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, पुणे जिल्हा आणि शहरामध्ये पहिला डोस देण्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झाला आहे.
त्यांना दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करायचे आहे.
त्यानंतर राहिलेल्या लोकांना पहिला डोस द्यायचे ठरले आहे.

बूस्टर डोसबाबत काय म्हणाले…

अजित पवार यांनी बूस्टर डोस विषयी म्हटले की, काही आमदारांनी म्हटले आहे की आता ज्यांनी दोन डोस घेतले, त्यांना तिसरा बूस्टर डोस द्या. मात्र, सध्या सगळ्यांना पहिले दोन डोस देऊ.
त्यानंतर बूस्टर डोसचा विचार करू.
अनेक ठिकाणी पहिला डोस देखील द्यायचे राहिले आहेत.
तिसर्‍या बूस्टर डोससंदर्भात राज्य सरकार सहमत आहे.
पण 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना दोन्ही डोस झाल्यानंतरच बूस्टर डोस देण्याचा विचार करण्यात येईल.

 

वैयक्तिक स्तरावर बूस्टर डोस घेऊ शकता

अजित पवार पुढे म्हणाले की, वैयक्तिक स्तरावर खरेदी करून बूस्टर डोस घेण्यासाठी सरकार कुणालाही थांबवणार नाही.
कुणी स्वत:च्या पैशातून बूस्टर डोस घ्यायचे ठरवले, तर त्याला नाही म्हणण्याचे कारण नाही.

आरोग्य सेवकांना सर्वप्रथम बूस्टर डोस

ते पुढे म्हणाले, ज्या वेळी बूस्टर डोस देण्याची सुरुवात होईल, तेव्हा आरोग्य कर्मचार्‍यांना प्राधान्य राहिल. बूस्टर डोससंदर्भात त्या-त्या वेळच्या गरजेनुसार लसीकरण केले जाईल.
इतरांचे आरोग्य जपण्याचे काम डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी करतात.
यासाठी त्यांनाच बूस्टर डोससाठी प्राधान्य राहील.

 

Web Title : Booster Dose Planning | deputy cm ajit pawar corona in maharashtra booster dose vaccine supply

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Floating ATM | तलावात तरंगणारे अनोखे ATM, ग्राहकांसाठी SBI ने सुरू केलेली विशेष सेवा बनली आकर्षणाचे केंद्र

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पतीने पत्नीला दिल्या वेडे होण्याच्या गोळ्या

Kirit Somaiya | खा. भावना गवळींना केला 100 कोटींचा घोटाळा, मुख्यमंत्री आणि पोलीस ‘प्रोटेक्ट’ करतात; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप