Brahmastra 2 मध्ये रणवीर सिंग नाही तर ‘हा’ सुपरस्टार साकारणार देव?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Brahmastra 2 | अयान मुखर्जी (Ayan Mukerji) दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ (‘Brahmastra: Part One Shiva’) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. यातील देवच्या भूमिकेवरून अद्याप पडदा उचलला गेला नाही. त्यामुळे आता देवच्या भूमिकेत नेमका कोणता कलाकार असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. ब्रह्मास्त्र (Brahmastra 2) हा चित्रपट एकूण तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात देवच्या भूमिकेला अधिक महत्त्व आहे. हि भूमिका कोण साकारणार हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या भूमिकेसाठी प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टारला ऑफर दिल्याचे समजत आहे.

 

कटप्पाने बाहुबलीला का मारलं, असा प्रश्न काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनात घोळत होता. बाहुबली- द बिगनिंग (Baahubali – The Beginning) या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन वर्षांपर्यंत या प्रश्नाने प्रेक्षकांना छळलं. त्यानंतर आता ब्रह्मास्त्रच्या प्रदर्शनानंतर असाच एक प्रश्न प्रेक्षकांना सतावतोय. हा देव नक्की कोण आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. देवच्या भूमिकेसाठी सोशल मीडियावर अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा झाली. या चित्रपटात देवच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग (Ranveer Singh), ऋतिक रोशन (Hrithik Roshan) यांची नावे चर्चेत होती मात्र निर्मात्यांनी त्यावर अद्याप काही ठोस उत्तर दिलं नाही.

 

Brahmastra 2 मधील देवच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी आता केजीएफ स्टार यशशी (KGF Star Yash) संपर्क साधला आहे.
ब्रह्मास्त्र 2 मधील देवच्या भूमिकेसाठी यशला (Yash) विचारण्यात आले आहे.
मात्र याबद्दल अद्याप निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
यशला उत्तर देण्यासाठी त्यांनी जानेवारी 2023 पर्यंतचा वेळ दिला आहे.

 

Web Title :- Brahmastra 2 | brahmastra 2 not ranveer singh but kgf star yash approached for dev role in ayan mukerji film

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gujarat Election 2022 | निवडणूक आयोगाचा निर्णय ! गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी 900 अधिकार्‍यांच्या बदल्या, जाणून घ्या कारण

Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर

Tata Airbus Project | काँग्रेसचा घणाघाती आरोप, शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील