Pune Crime | रेडाच्या ढुशीने तरुणाचा हात फॅक्चर, अवघड जागी खुपसले ‘शिंग’; रेड्याचा मालक ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | रस्त्याच्या कडेला माळी काम करीत असताना अचानक एक रेडा उधळला व त्याने तरुणाला ढुशी मारुन उचलून आपटले. त्यात रेड्याने अवघड जागी शिंग घुसविल्याने तरुण गंभीर (Pune Crime) जखमी झाला. तसेच त्याचा हात फॅक्चर झाला आहे.

याप्रकरणी सुभाष लोंढे (वय ३२, रा. वीर फार्म हाऊस, सांगरुण, ता. हवेली) या तरुणाने उत्तमनगर पोलिसांकडे (Uttam Nagar Police) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी रेड्याचा मालक तुकाराम ज्ञानोबा कदम (वय ५५, रा. मांडवी, ता. हवेली) यांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष लोंढे (Subhas Londhe) हे मुळचे बीड (Beed) जिल्ह्यातील राहणारे असून वीर फार्म हाऊस येथे माळीकाम करतात.
ते २४ सप्टेंबर रोजी दुपारी फार्म हाऊसच्या बाहेर रस्त्याच्या कडेला काम करत होते.
त्यावेळी तुकाराम कदम हे आपला रेडा घेऊन बहुलीच्या दिशेने जात होते.
त्याचवेळी अचानक रेडा उधळला. त्याने रस्त्याच्याकडेला काम करीत असलेल्या सुभाष लोंढे यांच्यावर शिंगाने हल्ला केला.
त्यांच्या अवघड जागेवर शिंग खुपसले. त्यांना उचलून आपटले.
त्यात त्यांचा डावा हात फॅक्चर झाला असून अवघड जागी गंभीर दुखापत झाली आहे.
त्यांच्यावर औंध (Aundh) येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
उपचारानंतर आता फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक जायभाय (Sub-Inspector of Police Jayabhay) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | pune crime news of uttamnagar police station area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai High Court | कोवळ्या वयात मुलांना आईची गरज; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’

Yogesh Tilekar | ओबीसींचा इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा; भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांची मागणी