‘या’ 2 देशांपासून भारतानं सावध रहावे : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात भारत आणि अमेरिकेचे संबंध कायमच मैत्रीपूर्ण राहिले. अनेकदा ट्रम्प आणि मोदी यांनी एकमेकांचे भरभरुन कौतुक केल्याचंही पहायला मिळाल. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे काही तासांनंतर राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. तत्पूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला संबोधित केलं. यामध्ये त्यांनी ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या राजधानीमध्ये कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त केलं. एवढेच नाही तर चीनला इशारा देत मित्रदेश असणाऱ्या भारताला दोन देशांपासून सावध राहण्याचा इशारा ट्रम्प प्रशासनाने दिला आहे.

ट्रम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम करणाऱ्या माइक पोम्पिओ यांनी व्टिटरवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे आभार मानले आहे. पोम्पिओ यांनी या ट्विटला ब्रिक्स लक्षात आहे का?, असा प्रश्न विचारत सुरुवात केलीय. ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बी आणि आय च्या लोकांना सी आणि आर पासून धोका आहे असं म्हटलं आहे. म्हणजेच ब्राझील आणि इंडिया म्हणजेच भारतीय नागरिकांना चीन आणि रशियापासून धोका असल्याचं पोम्पिओ म्हणाले आहेत.

चीनला असाही दणका
ट्रम्प प्रशासनाचा आजचा शेवटचा दिवस असून जाता जाता त्यांनी चीनला पुन्हा एक दणका दिलाय. चीनने उइगर मुस्लीमांचा नरसंहार केला आणि हा मानवेविरुद्ध केलेला गुन्हा असल्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. झिनजियांगमधील स्वत:चे (चीनचे) धोरण, पद्धती आणि गैरवर्तवणुकीसंदर्भातील विस्तृत माहिती देणारे कागदपत्रांच्या आधारे पोम्पिओ यांनी चीनमध्ये उइगर मुस्लींवर होत असणारा हिंसाचार हा किमान मार्च २०१७ पासून सुरु असल्याचं म्हटलं आहे. पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधताना पॅम्पो यांनी ही माहिती दिल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.
मिळालेल्या सर्व माहितींची पडताळी केल्यानंतर मला खात्री आहे की चीनने कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली शिनजियांगच्या पश्चिमेला राहणाºया उझगर मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांकांचा नरसंहार केला आहे़ माझ्या मते, अजूनही हा नरसंहार सुरु असून या माध्यमातून उइगर मुस्लिमांना चीनमधून कायमचं संपवण्याचा चीनचा विचार आहे, असंही पॅम्पो यांनी नमूद केलं आहे.

अनेकदा झालीय चीनवर टीका
चीनने कायमच शिनजियांगमध्ये चालवण्यात येणारे कार्यक्रम हे व्होकेशन ट्रेनिंग सेंटर्स म्हणजेच प्रशिक्षण शिबिरं असल्याचे म्हंटल आहे़ स्थानिकांना नवीन कला आणि कौशल्य शिकवले जात असल्याचा दावा चीनने केलाय. मात्र, जागतिक स्तरावर अनेक देशांनी या छावण्यांमध्ये उइगर मुस्लिमांवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप केलाय.