500 रूपयाची लाच घेताना महिला अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी येथील पुरवठा शाखेतील अव्वल कारकून श्रीमती अमिता सुरेश कासार (वय ४२ वर्षे, पुरवठा हिशोबी अव्वल कारकुन, तहसील कार्यालय, पाथर्डी, जि.अहमदनगर, रा. शासकीय निवासस्थान बिल्डींग नं. २, क्वार्टर नं. ३०२, पाथर्डी जि. अहमदनगर) यांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी ही कारवाई केली.

याबाबत माहिती अशी की, स्वस्त धान्य दुकानदाराकडे अव्वल कारकून अमिता कासार यांनी स्वस्त धान्य दुकानाचे दिलेल्या चलनाच्या मोबदल्यात पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत स्वस्त धान्य दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर विभागाकडे तक्रार केली होती. पंच साक्षीदारांसमक्ष आज लाच मागणी पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान श्रीमती कासार यांनी तक्रारदार यांचे स्वस्त धान्य दुकानाचे दिलेल्या चलनाचे मोबदल्यात म्हणून पाचशे रूपये लाचेची मागणी केली. ही रक्कम पाथर्डी तहसील कार्यालयात स्वीकारली. आधीच सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कासार यांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पो.हे.कॉ. तन्वीर शेख, पो.ना. प्रशांत जाधव, पो.ना. रमेश चौधरी, महीला पो.कॉ. राधा खेमनर आदींच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –