धक्कादायक ! लग्न लावून देणाऱ्या भटजीसोबतच पळाली नवरी

विदीशा : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील सिरोंज शहरात एक अजबच प्रकार समोर आला आहे. लग्न लावून देणाऱ्या भटजीसोबतच लग्नाच्या दुसऱ्या आठवड्यात नवरी मुलगी पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दोन आठवड्यापुर्वी लग्न करून घरी आणलेली नवरीनेच भटजीसोबत पलायन केल्याने कुटुंबियांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

विनोद महाराज हा गावातील एका मंदिरात पुजारी होता. त्याने ७ मे रोजी संबंधित तरुणीचं लग्न तरुणाशी लावून दिलं. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणूकीचा गोंधळ सुरु होता. त्याचवेळी लोकसभा निवडणूकीचा निकाल होता. तेव्हा गावात २३ मे रोजी एक लग्न होतं. त्या लग्नासाठी विनोद महाराजला बोलविण्यात आलं होतं.

परंतु मुहुर्त जवळ आला तरी महाराजाचा काही पत्ता लागेना. त्यामुळे लोकांनी त्या भटजीला शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा गावातील २१ वर्षीय नवविवाहित तरुणीदेखील घरातून गायब असल्याचे समजले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर मात्र धक्कादायक प्रकार समोर येत गेला.

भटजी विनोद महाराज आणि तरुणीचे दोन वर्षांपुर्वीपासून प्रेमसंबंध होते. त्याचं आधीच एक लग्न झालेलं असून २ मुलंही आहेत. त्याचं कुटुंबही गायब आहे. दरम्यान पळून जाताना तरुणीने आपल्या सोबत दीड लाखांचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकडही नेल्याचे समोर आले.