Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीसाठी अजित पवारांनीही घेतला उमेदवार अर्ज, हा प्लॅन ‘बी’ आहे की ‘ए’, राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha Election 2024 | राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘चार सौ पार’ ची घोषणा केल्याने भाजपा मित्रपक्षांच्या एक-एक जागेसाठी देखील खुप काळजी घेताना दिसत आहे. त्यातच बारामतीची निवडणूक अजित पवार यांच्यासह भाजपासाठी (BJP) सुद्धा प्रतिष्ठेची झाली आहे. येथे शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या आहेत. मात्र, काल सुनेत्रा पवार आणि अजित पवार दोघांनीही उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.(Baramati Lok Sabha Election 2024)

प्रत्यक्षात प्रमुख उमेदवारासोबत असा डमी फॉर्म राजकीय पक्षांकडून भरला जातो. चुकून अर्ज अवैध ठरल्यास आयत्यावेळी गडबड नको म्हणून डमी अर्ज भरला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि सचिन दोडके यांनी अर्ज घेतले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नावे अर्ज घेतले गेले आहेत.

सुनेत्रा पवार १८ एप्रिलला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार हे खबरदारीचा उपाय म्हणून डमी उमेदवार म्हणून अर्ज भरू शकतात.

बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ मार्चपासून सुरूवात झाली आहे.
अर्ज भरण्याची मुदत १९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. दरम्यान, बहुजन समाज पार्टी, देश जनहित पार्टी,
अखिल भारतीय जनता दल, रिपाइं आदी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी देखील उमेदवारी अर्ज घेतले आहेत,
असे बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अजित पवार यांनीही बारामतीसाठी उमेदवारी खरेदी केल्याने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.
रोहित पवार यांनी म्हटले की, दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील.
आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार हे स्वत: आदेश द्यायचे.
आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो.

अजितदादांना टोला लगावताना रोहित पवार पुढे म्हणाले, अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि दिल्लीवरून
आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या, तर अजितदादांना ते मनाविरुद्ध असलं तरी
ऐकावे लागेल. त्यामुळे ते त्याबाबतीत काय करतात हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mundhwa Police Pune | रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा! प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग मुंढवा पोलीस ठाण्यात केली जमा; पोलिसांकडून रिक्षाचालकाचे कौतुक

Baramati Lok Sabha Election 2024 | अजित पवारांनीही उमेदवारी अर्ज घेतला, रोहित पवार म्हणाले, ”…तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील”

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेच्या रणांगणात ‘एमआयएम’ची लवकरच एंट्री? होऊ शकते चौरंगी लढत