Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून अखरे उदयनराजे भोसलेंना भाजपाची उमेदवारी; भोसले विरूद्ध शिंदे सामना रंगणार

सातारा : Satara Lok Sabha Election 2024 | भाजपाने (BJP) लागोपाठ जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवार यादीत उदयनराजेंचे (Udayanraje Bhosale) नाव नसल्याने त्यांच्यासह त्यांचे समर्थक देखील अस्वस्थ झाले होते. अखेर साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपाने आज उमेदवारी जाहीर केली आहे. सातारा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे साताऱ्यात भोसले विरूद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे.(Satara Lok Sabha Election 2024)

साताऱ्यात काल शक्तीप्रदर्शन करत शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता उमेदवारी जाहीर झाल्याने उदयनराजे देखील उमेदवारी अर्ज दाखल करतील.

उमेदवारीचा शब्द मिळाल्यानंतर सातारा मतदारसंघात उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून प्रचारालाही लागले होते.
गावोगावी भेटी, लोकांशी संवाद सुरू होता. परंतु महायुतीकडून अधिकृतरित्या सातारा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर
केली नव्हती. परंतु आता भाजपाने ही उमेदवारी जाहीर केली आहे.

महायुतीकडून अधिकृतरित्या सातारा मतदारसंघातील उमेदवारीला उशीर होत असल्याने विरोधकांनी सुद्धा सातारच्या
गादीच्या मानसन्मानाचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती.

मध्यंतरी सातारची जागा अजित पवार गटाकडे जाणार असल्याची चर्चा होती परंतु, उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर
लढण्यास नकार दिला होता. आता उदयनराजे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mundhwa Police Pune | रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा! प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग मुंढवा पोलीस ठाण्यात केली जमा; पोलिसांकडून रिक्षाचालकाचे कौतुक

Baramati Lok Sabha Election 2024 | अजित पवारांनीही उमेदवारी अर्ज घेतला, रोहित पवार म्हणाले, ”…तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील”

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेच्या रणांगणात ‘एमआयएम’ची लवकरच एंट्री? होऊ शकते चौरंगी लढत