Vadgaon Sheri Pune News | पुणे : बागेत खेळणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील कृत्य, नारधमास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vadgaon Sheri Pune News | बागेत खेळणाऱ्या दोन लहान मुलांना आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने त्यांच्यासोबत अश्लील कृत्य (Obscene Act) करुन त्यांचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 55 वर्षीय नराधमावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केरुन अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.15) वडगाव शेऱी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात रात्री साडे नऊ ते सव्वा दहा या दरम्यान घडली.

याबाबत पीडित मुलाच्या 48 वर्षीय वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सिंधु यलप्पा दिवटे (वय-55 रा. वडगाव शेरी) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात यापूर्वी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा 9 वर्षाचा मुलगा व मेहुण्याचा 11 वर्षाच्या मुलासोबत राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात वॉकिंग करत होते.

त्यावेळी मुले बागेतील घसरगुंडी वर खेळत असताना आरोपी त्या ठिकाणी आला.
त्याने मुलांना आईस्क्रीम खायला देतो असे सांगून त्यांच्यासोबत अश्लील वर्तन केले.
याबाबत मुलाने वडिलांना सांगितले. त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन
अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोडकरी करीत आहेत.

पाठलाग करुन महिलेचा विनयभंग

वारजे : रस्त्याने जाता येता महिलेचा पाठलाग करुन तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला.
तसेच पतीच्या मोबाईलवर फोन करुन महिलेबाबत बोलून त्यांच्या मनात गैरसमज निर्माण केल्याप्रकरणी अमर दशरथ जाधव (वय-33 रा. वारजे माळवाडी) याच्यावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mundhwa Police Pune | रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा! प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग मुंढवा पोलीस ठाण्यात केली जमा; पोलिसांकडून रिक्षाचालकाचे कौतुक

Baramati Lok Sabha Election 2024 | अजित पवारांनीही उमेदवारी अर्ज घेतला, रोहित पवार म्हणाले, ”…तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील”

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेच्या रणांगणात ‘एमआयएम’ची लवकरच एंट्री? होऊ शकते चौरंगी लढत