गुगल ट्रान्सलेट होतं म्हणून फुललं प्रेम 

वृत्तसंस्था : असं म्हणतात की, प्रेम आंधळ असतं. त्याला भाषा वय अशी कसलीही मर्यादा नसते अशा प्रकारची अनेक वाक्ये तुम्ही ऐकली असतील. असंच काही सांगणारी एक प्रेमकहाणी समोर आली आहे.  ब्रिटनच्या मुलाची आणि इटलीच्या मुलीची ही प्रेमकथा आहे. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेही एकमेकांना एकमेकांची भाषा समजत नसतानाही. केवळ गुगल ट्रान्सलेटची त्यांचे हे प्रेम फुलण्यास मोलाची मदत झाली.
Chloe Smith आणि Daniele Marosco असं या युगुलाचं नाव आहे. २०१७ मध्ये फिरायला गेले असताना या दोघांची भेट झाली. दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. त्यांना एकमेकांना जाणून घ्यायचं होतं परंतु भाषा समजत नसल्याने त्यांना अडचणी येऊ लागल्या. शेवटी त्यांना संवाद साधण्यासाठी गुगल ट्रान्सलेटची मदत घ्यावी लागली. आणि त्यांचे प्रेम फुलण्यास मदत झाली.
दोघांना एकमेकांची भाषा समजावी म्हणून Chloe Smith आणि Daniele Marosco दोघे एकत्र सिनेमे बघू लागले. यासाठी दोघांनी सुट्टीही सोबत घालवली इतकेच नाही तर त्यांनी एकमेकांच्या परिवारासोबतही वेळ घालवला. दोघांच्या परिवारातील लोकही या दोघांच्या नात्याबाबत आश्चर्यचकित झाले आहेत.
सध्या दोघेही लंडनमध्ये राहत आहेत. सध्या दोघेही नाेकरी करतात.  Chloe मेकअप आर्टीस्ट आहे तर Daniele हा एका हॉटेलमध्ये काम करतो. पण दोघांनी एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं समजलं. आता त्याला Chloe इंग्रजी शिकवते. तर तो तिला इटालियन भाषा शिकवतोय. दोघांनी संवाद साधण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा आधार घेतला. त्यांनी कोणत्याही भाषेचा क्लास न लावता त्यांचं नातं मजबूत केलं.